लोकमंगल ऑक्सि पार्क शॉपिंग सेंटर चालक-मालक संघटनेच्या वतीने वारकरी संप्रदाईक हरिपाठ करून रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी हरिपाठ परिवाराच्या साठ महिला संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेचे तिस मुली व तीस मुलं यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात हरिपाठ संपन्न करण्यात आला.
या सर्व वारकऱ्यांचा संयोजकाच्या माध्यमातून फेटे बांधून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मृदंगसाथ ज्योतीराम चांगभले महाराज, अनिकेत जांभळे महाराज यांनी केली. हा कार्यक्रमास आलेल्या महिला व मुलांना बळीराम जांभळे यांनी प्रशिक्षण दिले आहे. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी लोकमंगल ऑक्सि पार्क शॉपिंग सेंटर सर्व चालक-मालक यांचे सहकार्य लाभले.