भारताची नेमबाज अन् ऑलिम्पियन क्वीन मनू भाकरसह बुद्धिबळाच्या पटलावरील नवा राजा डी. गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा प्रवीण कुमार यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मेजर ध्यान्यचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपापल्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी या चौघांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला होता. शुक्रवारी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनू भाकर-मनू भाकर ही देशातील सर्वोत्तम नेमबाजपटू आहे. २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरनं वैयक्तिक आणि मिश्र इवेंटमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिच्या या सर्वोत्तम कामगिरीबद्दल तिला देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डी. गुकेश-डी गुकेश हा सर्वोत्तम बुद्धिबळपटू पैकी एक आहे. २०२४ मध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारत तो सर्वात युवा जगजेत्ता ठरला होता. बुद्धिबळाच्या खेळात छाप सोडून क्रीडा जगतात डंका वाजवणाऱ्या या युवा खेळाडूला राष्ट्रपतींकडून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हरमनप्रीत सिंग-सर्वोत्तम हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत कमाल करून दाखवली. त्याच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघानं २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. यााधीच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली होती. याशिवाय २०२३ मध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाचा पराक्रमही या खेळाडूने करुन दाखवला आहे. या उल्लेखनिय कामगिरीबद्दल हरनप्रीत सिंगला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रवीण कुमार-प्रवीण कुमार याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत पुरुष गटातील उंच उंडी टी-६४ क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. २०२० मध्ये टोकियोत पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत या पठ्य़ानं रौप्य पदक जिंकले होते. २०२२ मध्ये आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. या लक्षवेधी कामगिरीसह त्याे पॅरा अॅथलेटिक्समध्ये आपली छाप सोडली. प्रवीण कुमार याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा खेलरत्न पुस्काराने सन्मानित करण्यात आले.