येस न्युज मराठी नेटवर्क : आज मुंबई येथील देवगिरी निवास्थानी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिलीप माने यांनी सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दक्षिण सोलापूर मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत दिलीप माने यांनी अजितदादांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी गंगाधर बिराजदार, अप्पासाहेब काळे आणि प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.