पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. . कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून ते कुवेतमध्ये आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्याकडून ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत भव्य स्वागत केले. कुवेतमधील ‘बायन’ पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दरम्यान पंतप्रधान मोदी आणि कुवेतचे अमीर शेख यांच्यात कुवेतमध्ये द्वीपक्षीय बैठक देखील पार पडली.