दिव्यांग दिन ३ डिसेंबर
वीर ब्रह्मा माशाळकर एक दिव्यांग व्यक्ती लहानपणीच पोलिओ होऊन दोन्ही पायाने अधू असल्याने ती व्यक्ती दिव्यांग झाले. आर्थिक परिस्थितीने बिकट व स्वतःचे पाय ने अपंग असताना पायावर उभे राहण्याची जिद्द सोलापूर मध्ये कसं बस दहावी शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणार्थ मध्ये प्रवेश घेतला व शिलाई मशीन हस्तकला त्याच्यामध्ये आपले शिक्षण पारंगत केले आज गेली चार वर्षापासून तो अनेक लोकांचे कपडे अल्टरेशन करून देतो मुलांच्या शाळेच्या बॅगा चैन फाटलेले कपडे शिवून देण्याचे कार्य चालू आहे.
त्यालाच इको नेचर क्लब अंतर्गत एक सामाजिक उपक्रम म्हणून बेरोजगार अर्थ त्याला त्याचा व्यवसाय उभा करण्यास सहकार्य केले आज तो सैफुल परिसरात विजापूर रोड परिसरातील अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. एक दिव्यांग व्यक्ती आपला जरी पाय नसले तर स्वतःच्या पायावर उभा राहून आपला परिवार चालू शकतो हे एक उत्तम उदाहरण.
समाजामध्ये माणुसकी टिकली पाहिजे व माणूस माणसाच्या मदतीला आले पाहिजे या मताचे इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर यांनी अशा अनेक दिव्यांग व्यक्तींना आपल्या परीने जितके सहकार्य करता येईल ते प्रयत्न करत राहतात आज त्यांच्या सहकार्यामुळे गेले तीन वर्ष त्यांचा व्यवसाय व्यवस्थितपणे चालू आहे. त्या दिव्यांग बंधूंना दुकान चालू करण्यासाठी दुकान व साहित्य तयार करून दिले. तर दिव्यांग बंधू हे एक आपल्या प्रमाणे कार्य करणारे व आपल्यापेक्षा जास्त मेहनती असणारे त्यांचा आदर सगळ्यांनी केलाच पाहिजे.