पराभव झाला म्हणून खचून न जाता पुन्हा जनतेच्या सेवेसाठी कामाला सुरुवात, महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार :- चेतन नरोटे
सोलापूर शहर काँग्रेसची चिंतन बैठक संपन्न, नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार
दिनांक :- ०१ डिसेंबर २०१४
विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीवर निवड झालेल्या सुशीलाताई आबुटे, विनोद भोसले, शकील मौलवी, राहुल वर्धा, तसेच शहर काँग्रसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना खा. प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता. अनेक सर्व्हेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती. पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने EVM मदतीने विजय मिळविला. भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत. देशात, राज्यात लोक EVM मशीन वर शंका उपस्थित करत आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत EVM मशीन वर चर्चा झाली EVM मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावेत यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे. आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून मरगळ झटकुन कामाला लागा नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायचे आहे. लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही. आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना प्रणितीताई शिंदे म्हणाले की मी महाविकास आघाडीचे प्रामाणिक पणे काम केले त्यामुळेच प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळे दिलीपराव माने यांना AB फॉर्म देऊ शकले नाही. मला माझा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. या निवडणुकीत मतदान केलेल्या, सहकार्य केलेल्या, काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या, माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार.
चेतन भाऊ नरोटे म्हणाले की, मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. शिंदे साहेब, प्रणितीताईंनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन विधानसभेची उमेदवारी दिली पराभूत झालो तरी लढलो. भाजप EVM मशिनच्या मदतीने, पैशाचा प्रचंड वापर करून, धार्मिक तेढ निर्माण करून विजय मिळवून लोकशाही संपविण्याचे काम करत आहे. पराभवाने खचून न-जाता शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या आदेशाने लगेच कामाला लागलो मतदार संघातील सामान्य जनतेसाठी कायम काम करत राहणार. माझ्यावर विश्वास दाखविलेल्या सर्व जनतेचे आभार मानतो. महानगरपालिका निवडणुकसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.
या बैठकीस संजय हेमगड्डी, नरसिंह आ, अशोक निम्बर्गी, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, आरिफ शेख, प्रवीण दादा निकाळजे, शिवा बाटलीवाला, श्रीदेवी फुलारे, परविन इनामदार, फिरदोस पटेल, अनुराधाताई काटकर, प्रमिलाताई तूपलवंडे, सुनील रसाळे, विश्वनाथ साबळे, सुशीलाताई आबुटे, NK क्षीरसागर, बसवराज म्हेत्रे, केशव इंगळे उदयशंकर चाकोते, हनुमंतू सायबोळू, नागनाथ कदम, जुबेर कुरेशी, हसीब नदाफ, अनिल मस्के, शफी हुंडेकरी, मैनुद्दीन हत्तूरे, तिरुपती परकीपंडला, शोहेब महागामी, हारून शेख, अशोक कलशेट्टी, वाहिद विजापुरे, महेश जोकारे, सुमन जाधव, नागेश म्याकल, भारती इप्पलपल्ली, वीणा देवकते, शोभा बोबे, लता गुंडला, शुभांगी लिंगराज, अंजली मंगोडेकर, करीमूनिसा बागवान, संध्या काळे, लखन गायकवाड, प्रवीण जाधव, विवेक कन्ना, चक्रपाणी गज्जम, शिवशंकर अजनाळकर, बालाजी जाधव, संजय गायकवाड, राजेश झंपले, सुभाष वाघमारे, दीनानाथ शेळके, नागेश म्हेत्रे, परशुराम सत्तारवाले, सागर उबाळे, संजय गायकवाड, शाहू सलगर, अभीनंदन राठोड, सचिन गुंड, गिरीधर थोरात, दशरथ गायकवाड, अनिल जाधव, सुबोध सुतकर, आसिफ तिम्मापुरे, धीरज खंदारे, सुनील सारंगी, नागनाथ शा, दशरथ सामल, किरण खरात, मल्लेश सूर्यवंशी, आकाश जांभळे, विवेक इंगळे, मल्लिनाथ सोलापूरे, चंद्रकांत पात्रे, अभिषेक अचूगटला, अन्वर शेख, दत्ता नामकर, गंगाधर शिंदे, उमर मुकेरी, मनोहर माचरला, शिवाजी साळुंखे, धैर्यशील बाबरे, धीरज थोरात, श्याम केंगार, आनंद भंडारे, शोहेब कडीचूर, मुमताज तांबोळी, मुमताज शेख, निशा मरोड , विजयालक्ष्मी झाकणे, वर्षा आतनुरे, मीना गायकवाड, भाग्यश्री जाधव, अश्विनी सोलापुरे, बसू कोळी, अभिषेक गायकवाड, धम्मा जगझाप, राजेश सुरवसे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याबैठकीचे सूत्रसंचालन तिरूपती परकीपंडला यांनी तर आभार अँड केशव इंगळे यांनी मानले.