बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत हगलूर गावातील हिन्दु स्मशानभुमीच्या सुशोभिकरण व नविन शवदाहिनीकरीता आर. सी. सी शेड बांधण्याच्या कामाचे भुमीपुजन
उत्तर तालुक्यतील हगलूर गावात हिंन्दु स्मशानभुमी मध्ये काही सोय सुविधा नव्हती मोकळया जागेत अंत्यसंस्कार केले जात होते हगलूर ग्रामपंचायतीचे ने बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक यांचे करे स्मशानभुमी मधिल कामे करून मिळावे अशी मागणी केली बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळानी यांनी हगलूर गावातील हिन्दू स्मशानभूमी सुशोभीकरण करून या मध्ये शवदहिनीकरीता आर सी सी नविन शेड बांधकाम, बिडची शवदाहिणी बसवणे. वेटिंग कटटा, पत्रा शेड, कंपाऊंड, गेट, पेव्हर ब्लॉक, पाण्याची टाकी विविध कामे करण्यास तात्काळ मंजुरी दिली.
बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत हिंन्दु स्मशानभुमी येथिल कामाचे भुमीपुजन आज बालाजी अमाईन्स चे तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार यांचे हस्ते नारळ वाढऊन करण्यात आले या कार्य कमास सरपंच कुमार खेळळे उपसरपंच अंगद चव्हाण, सुरेश मगर, ज्ञानेश्वर कुंभार पांडूरंग नवगिरे सुरज नवगिरे हरी शिंदे व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, प्रदिप कोंडले हगलूर ग्रामपंचायतीचे सदस्य व गावातील नागरीक उपस्थित होते.