26 लाख मतदारांनी बजावला हक्क
सोलापूर : सन 2019 च्या विधानसभेच्या तुलनेत यावर्षी झालेल्या विधानसभेसाठी रेकॉर्ड ब्रेक असे 67.72% एवढे मतदान झाले आहेत म्हणजेच सुमारे चार टक्के मतदान वाढले. 38 लाख 48 हजार 869 पैकी 26 लाख 6571 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 13लाख 66 हजार588 पुरुष मतदारांचा तर बारा लाख 39 हजार 868 महिला मतदारांचा समावेश आहे. सांगोला मतदार संघात रेकॉर्ड ब्रेक असे 78.27 टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ माढ्यामध्ये 76% तर बार्शी मध्ये 73 टक्के मतदान झाले. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 57.77% मतदान झाले.
- माढा मतदारसंघात दोन लाख 67 हजार 691 मतदारांनी मतदान केले. 75.90% मतदान झाले.
- बार्शी मतदारसंघात 2,46,712 जणांनी मतदानाचा हक्क नोंदविला. इथे 73 टक्के मतदान झाले.
- मोहोळ मतदार संघात दोन लाख तीस हजार 850 जणांनी मतदान केले इथे 69.65% मतदान झाले.
- सोलापूर शहर उत्तर मतदार संघात एक लाख 91 हजार 394 जणांनी मतदान केले इथे मतदानाची टक्केवारी 58% आहे.
- सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात दोन लाख 291 जणांनी मतदान केले इथली मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजे 57.77% आहे.
- दक्षिण सोलापूर मतदार संघात 2 लाख 23 हजार 624 जणांनी मतदान केले इथे 58.42% मतदान झाले आहे.
- पंढरपूर मतदार संघात दोन लाख 59 हजार 777 जणांनी मतदान केल्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 69.51% आहे.
- सांगोला या मतदारसंघात तब्बल दोन लाख 61 हजार 13 जणांनी मतदान केले असून इथे जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक असे 78.27% मतदान झाले.
- माळशिरस या मतदारसंघात 2, लाख 40 हजार 851 जणांनी मतदान केले. इथे मतदानाची टक्केवारी 68.90% एवढी झाली आहे.
एकूणच यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्यामुळे मतदानाचा टक्का 68% एवढा झाला आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे प्रत्येक उमेदवारांना टेन्शन आहे