अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट व संजीवनी आर्ट क्राफ्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ला व घरकुल बांधणी स्पर्धा =2024 घेण्यात आले होते. त्याचे बक्षीस वितरण समारंभ रविवारी श्री पंचमुखी हनुमान देवस्थान, विद्या नगर -2,शेळगी, येथे पार पडला.
यावेळेस प्रमुख पाहुणे
छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारणारे कलाकार श्री. सुशांत अंबुरे ,एस के बिराजदार प्रशालाचे मुख्याध्यापक श्री गुरुनाथ वांगीकर सर, शिवकुमार अळगी,प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश भाईकट्टी,संजीवनी आर्ट क्राफ्ट गॅलरी चे प्रमुख श्री चेतन बुऱ्हाणपुरे आदी मान्यवर उपस्थित होते..
प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे. मुलांनी आपली संस्कृती,धर्म व कला जपली पाहिजे.आणि मुलानी आपल्या मातीशी नाळ जोडलेली असणे आवश्यक आहे..असे मत अंबुरे यांनी मांडली.
महाराष्ट्रतील गड किल्ले सर्वानी पाहिले पाहिजे व त्याची प्रेरणा घेतली पाहिजे. शेळगी भागात हा उपक्रम राबवणारे पहिलेच प्रतिष्ठान आहे. हे काम अतिशय उल्लेखनीय आहे. असे मत वांगीकर सर यांनी मांडले..
प्रथम क्रमांक किल्ला
कु.मनस्वी मंगेश कळमणकर
द्वितीय क्रमांक किल्ला
कु. सूर्या शिवानंद जेऊरे
तृतीय क्रमांक किल्ला
कु. शिवम आनंद ढमामे
उत्तेजनार्थ किल्ला
कु. अंशीता विजयसिंह छत्रबंद
प्रथम क्रमांक घरकुल
कु. स्वरा नागेश तोडकरी
द्वितीय क्रमांक घरकुल
कु. संध्या श्याम मदुरे
तृतीय क्रमांक घरकुल
कु. आर्या सुनंदा शिवानंद भाईकट्टी
उत्तेजनार्थ घरकुल
कु. जुई मंगेश कळमणकर
यावेळी सूत्रसंचालन गणेश येळमेली यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत वेदपाठक यांनी मानले..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शिवानंद नागणसुरे,शिवानंद भाईकट्टी,अमित वांगी,प्रशांत मठपती,बसवराज स्वामी,सचिन बुऱ्हाणपुरे,नागेश धोडकुडे,संतोष वेळापुरकर,प्रविण निंबाळकर,रविकांत स्वामी आदींनी परिश्रम घेतले..