सोलापूर: प्रकाश आंबेडकर म्हणाले की राज्यात गेल्या कांही दिवसांपासून आरक्षणाच विषय गाजले. आरक्षण यात्रा सुरू होती. १९९० आधी तलाठी आणि ग्रामसेवक सुध्दा नव्हता, आरक्षणाने तलाठी, ग्रामसेवक डाॅक्टर उच्च पदस्थ अधिकारी झाले. माझ आरक्षण वाचल पाहिजे म्हणून लढा. ओबीसींनी सुध्दा दोन्ही आघाडीने आम्हाला किती जागा दिले हे विचाराव. सभागृहात प्रतिनिधी नसतील तर आरक्षण वाचणारच नाही. भाजपने नवीन धोरण सुरू केला. बटेंगे तो कटेंगे. जरांगे-पाटील यांनी गरीब मराठ्यासाठी आरक्षण मागितले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आरक्षणाला धोका आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका थांबले.आरक्षण गेला तर आपल्याला हिंदूच काढणार आहेत. कापणारा मुसलमान नाही. निजामी मराठा गरीब मयाठ्याला कापणार आहे. लक्ष्मण हाके वर हमला का झाला. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. एससी आणि एसटीच सुध्दा आरक्षण धोक्यात येणार आहे. आरक्षणाचा वर्गीकरण नको आहे.
संतोष पवार म्हणाले की,
वंचित हे एका जातीचे आणि धर्माच असल्याच सांगितली जाते. सर्व जाती धर्माचे उमेदवार वंचितमध्ये आहेत. दक्षिणमध्ये आजपर्यंत जातीधर्मावर राजकारण केल जात. जनावरांना दिवसातून तीन वेळा पाणी पाजाव लागत. पण माणसाला मात्र आठ दिवसांतून एकदा पाणी दिली जाते. सुभाष देशमुख यांनी रस्त्याशिवाय कांही केला नाही. दक्षिण, उत्तर आणि अक्कलकोटला पाणी मिळाल नाही. यांना यांचे नेते सभागृहात खाली बसवतात. चुका सुधारण्याची संधी आहे.
प्रियाताई संतोष पवार-
विजयाची नांदी, संतोष पवार हे नेतृत्वासाठी झगडत आहेत. मतदारांच्या मनातून राजा जन्माला येणार आहे. म्हणून हसले. तळागाळातील तरूण झगडतो आहे. बाबासाहेब यांचा नात जगाशी होत. आंबेडकर यांच्या विचाराला धरून वंचित आहे. विकल जावू नका.
प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांब, सोमनाथ साळुंखे, दक्षिण सोलापूरचे उमेदवार संतोष पवार, अक्कलकोटचे संतोषकुमार इंगळे, मध्यचे श्रीनिवास संगेपांग, बार्शीचे धनंजय जगदाळे, उत्तरचे विक्रांत गायकवाड, चंद्रशेखर गायगवळी, प्रियाताई पवार, मंगळवेढा अशोक माने, राजेश यशवनकुमार, माढ्याचे राहुल चव्हाण, आदी मान्यवर पदाधिकारी दक्षिण सोलापूरचा मतदार संघ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता