अक्कलकोट : अक्कलकोट मतदारसंघातील किणी या गावात महायुतीचे उमेदवार आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ बैठक घेतली. यावेळी गावात शेतकऱ्यांनी आणि महिलांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी शेतकरी वीज बिल माफीच्या निर्णयाचा किणीतील ग्रामस्थांना फायदा झाल्याचे समजले. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत सरकारचे कौतुक करत योजनेचा झालेला फायदा सांगितला.
याचप्रमाणे गावातील महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असून यामुळे अनेक फायदे झाल्याचे सांगत महायुती सरकारलाच पाठिंबा देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच गावातील प्रगतशील शेतकरी जाधव यांना सरकारच्या मार्फत तब्बल 1 लाख 70 हजार रुपयांचा पिक विमा मिळाला. यांच्याशिवाय किणी गावात अण्णाभाऊ साठे नगर व भिमनगर येथे बंदिस्त गटार बांधकाम, श्रीमंतलिंग मल्लिनाथ देवस्थानास संरक्षक भिंत, हिंदु दहन शेड बांधकाम, मल्लिकार्जुन मंदिर व मातंग वस्ती येथे सभामंडप बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत दुरुस्ती, मातंग वस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, गावांतर्गत सिमेंट रस्ता, विद्या विकास प्रशालेजवळ हायस्मार्ट दिवा बसवणे, अंगणवाडी इमारत दुरुस्ती, किणी ते बादोला रस्ता सुधारणा, धोत्री-हन्नूर-चुंगी-किणी-काझिकणवस रस्ता सुधारणा, मरगमवाले समाजवस्ती, मातंग वस्ती येथे सभामंडप बांधकाम, साठवण तलाव अशी कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे वीरभद्रेश्वर मंदिरासमोर सभामंडप व परिसर सुशोभीकरण, चांभार वस्ती येथे समाजमंदिर बांधकाम, चर्मकार वस्ती येथे सिमेंट रस्ता, सुलतानपूर रोड ते पंपहाऊस पर्यंत पाणंद रस्ता, नवीन अंगणवाडी बांधकाम, किणी सुलतानपूर रस्त्यावरील बोरी नदीवर पूल बांधकाम, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा सोय या कामांना मंजुरी मिळालेली आहे.
यावेळी अमोल हिप्पर्गी, दिलीप सिद्धे, प्रभाकर मजगे, अविनाश मडीखांबे, आनंद तानवडे, सागर कल्याणशेट्टी, विनायक जाधव, अशोक साखरे, बसवराज लिंबाडे, तुळजापुरेब, अजय मुकणार, तात्याराव साखरे, अनप्पा अल्लीमोरे, शिवयोगी तांबोळी, मल्लिकार्जुन होटगे, अमोल नागरशे, राहुल काळे यांच्यासह भाजप- महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.