येस न्युज नेटवर्क : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून काही मतदारसंघांबाबतही घोषणाही केली आहे. जिथं समीकरण जुळेल, त्या मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणूक लढवू, असं मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. त्यानुसार बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याचे जरांगे यांनी निश्चित केलं आहे.
आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत. आपल्याला आधार पाहिजे. राजकारणाचं वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. एखाद्या जिल्ह्याला जागा दिली तर पूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच यायचं. एक एक का होईना पण तो आधार होईल. तो विधानसभेत भांडेल. आपले मुद्दे मांडेल. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही. निवडून येणार्या जागांवर चर्चा करू. मुस्लिम आणि आंबेडकरी नेते येतील त्यांच्या जागा सांगतील. त्यावर चर्चा करू. कमीत कमी १० ते १५ आपल्या हक्काचे आहेत, हे म्हणायला होईल. २०० लडून पडण्यात अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार?
1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)
2) परतूर, (जालना जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) बीड, (बीड जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी,( परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड)
कोणकोणत्या मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार?
1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
5) जिंतूर, (परभणी जिल्हा)
6) औसा-(लातूर जिल्हा)
कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देणार?
1) बदनापूर राखीव जालना जिल्हा
2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे. त्यांना चार उंबरे घर हक्काचं करायचं आहे. मराठ्यांचे १५० ते २०० आमदार आहेत. पण आम्हाला आधार नाही. आम्हाला दार उघडं नाही. आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे. आमचा म्हणून काम सांगायचं आहे. माझी काही इच्छा नाही. मला यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी एक तरी माणूस द्यायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका. जात बघा. खूप जण आले. वगैरे वगैरे भरपूर नेते भेटायला आले. सर्वच पक्षाचे लोक आले होते, असे त्यांनी सांगितले