मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.