बार्शी येथील श्री भगवंत योग परिवार व पतंजली योग समिती कडून योगचा प्रचार व प्रसार केला जातो. तसेच योग वर्ग घेतले जातात. यामध्ये बार्शीतील सर्व स्तरातील मंडळींचा समावेश आहे. योग परिवार वतीने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित केला जातो. तसेच येथील प्रतिष्ठित डॉक्टर यांना धन्वंतरी पुरस्कार जाहीर केला जातो.
यावर्षीचा धन्वंतरी पुरस्कार बार्शी निवासी डाॅ विलास सरवदे जिल्हा आयुष अधिकारी सोलापूर यांना त्यांच्या स्वग्राम बार्शी येथे प्रदान करण्यात आला.
यापूर्वी बार्शी मधील प्रसिद्ध डाॅ अण्णा कश्यपी,डॉ बी. एम.नेने, डॉ नाना सामनगावकर, डाॅ भरत गायकवाड इत्यादी ज्येष्ठ डॉक्टरांना प्रदान करण्यात आला आहे.
डॉ विलास सरवदे यांचे आयुर्वेद व योगशास्त्रातील कार्य, त्यांचे याविषयी असलेली आवड, केलेले प्रचार प्रसार व सार्वजनिक आरोग्य मध्ये त्यांनी दिलेले योगदान, आयुष मंत्रालय उल्लेखनीय कार्य या सर्व बाबींचा विचार करून त्यांना धन्वंतरी पुरस्काराने काल बार्शी येथील जेष्ठ योगगुरु श्री अनिल वेदपाठक यांचे शुभ हस्ते त्यांच्या सुविध्य पत्नी डॉ अपर्णा सरवदे यांचे सह मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ प्रशांत मोहिरे, श्री मुकुंदराज कुलकर्णी प्रगतशील शेतकरी राजाभाऊ देशमुख, भगवंत पुरवठा मंडळीचे श्री देशमुख आणि मारुती रोपचे श्री मधुसूदन चांडक, बाबर इलेक्ट्रॉनिक्सचे दत्ता बाबर, डॉ अमित लाड, डाॅ गोदेपुरे अशी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
यावेळी पुरस्कार मनोगत व्यक्त करताना डॉ विलास सरवदे यांनी योगः कर्मसु कौशल्यम् म्हणजेच कर्मा मधील कुशलता ही जीवनात आचरणात आणावी. याबरोबरच आयुर्वेदिक पद्धतीने आहार, दिनचर्या, ऋतुचर्या पालन केले तर आपण चांगला समाज घडवू शकतो असे प्रतिपादन केले.
यानंतर संगीत रजनी मध्ये कोजागिरी पौर्णिमेचे गीते सादर झाले. आणि स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.