मोहोळ येथिल देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालय येथे आज बालाजी अमाईन्स लि च्यावतीने सी. एस. आर अंर्तगत महाविदयालयातील अंतिम वर्षातील विदयार्थ्यांकरीता तीन दिवसाचे प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) चे आयोजन करण्यात आले .प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) या वर्गाचे वर्गाचे उद्घाटन बालाजी अमाईन्स लि चे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेड्डी यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री राम रेडडी यांनी इंग्रजी भाषा जगातील सर्वात जास्त देशात वापरली जाते . युवकांनी इंग्रजीत संभाषण करण्याचा सराव करावा यामुळे त्यांना पुढिल वाटचालीमध्ये मोठ्या कंपनीच्या मुलाखातीमध्ये प्रभावशालीपणे आपली बाजु मांडणे सोपे जाईल. ग्रामिण भागातील महाविदयालयातील विदयार्थ्यांकरीता प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम) या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले आहे असे सांगितले. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांचे हस्ते या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास बालाजी अमाईन्स चे तांत्रिक सल्लागार श्री मल्लिनाथ बिराजदार, तसेच सारथी संडे इंग्लिश स्पीकर कल्ब चे श्री विठठल वंगा, मोहोळ देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालयाचे प्रतापसिंह गरड महाविदयालयातील प्राचार्य नंदकुमार पाटील, प्रा चंद्रशेखर कुबेर, प्रा अभिषेक बनाटे, प्रा विकम पवार बालाजी अमाईन्स चे बसवराज अंटद तसेच विदयार्थीवर्ग उपस्थित होते.
मोहोळ येथिल देशभक्त संभाजीराव गरड महाविदयालयातील ७५ विदयार्थ्यांकरीता स्पोकन इंग्लिश तीन दिवसाचे शिबीराचेआयोजन .(बालाजी अमाईन्स लि व सारथी संडे इंग्लिश स्पीकर कल्ब)
प्रोजेक्ट पॉसीबल (स्पोकन इंग्लिश प्रोग्राम)
महाविदयालयातील अंतिम वर्षातील विदयार्थ्यांना तीन दिवसाचे स्पोकन इंग्लिश प्रोग्राम आहे.
या प्रोग्रामची रचना अशी आहे या मध्ये सहाभागी विदयार्थ्यांना संभाषण कौशल्य विकास, इंग्रजी भाषेची मुलभूत माहिती, स्पर्धा त्मक जगात संभाषण व संवाद या करीता आत्मविश्वासाने व्यक्त होण्याकरीता सक्षम बनवणे विदयार्थ्यांचे इंग्रजी मध्ये संभाषण कौशल्य सुधारणे, स्टेज डेअरिंग, सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य, आत्मविश्वास व व्यक्तिमत्व सुधारणे.