जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विमानतळावरील उद्घाटन पूर्वतयारीची पाहणी व आढावा
सोलापूर, दिनांक 25:- सोलापूर विमानतळाचे उद्घाटन दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथून दूरदृश्य प्रणाली द्वारे होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावर नव्याने करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री महोदयाच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूने, विमानतळ प्राधिकरणचे बनोथ चांप्ला त्यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावरील सर्व कामकाजाची पाहणी करून माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.