येस न्युज नेटवर्क : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे यांना सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला फटकारल्याचं दिसून आलं. फडणवीसांनी कितीही गणित करू द्या मी त्यांची सगळी गणितं फेल करणार असा एल्गारच मनोज जरांगेंनी पुकारलाय. ते म्हणाले, तुम्ही महराष्ट्राच्या मराठ्यांना मूर्ख समजता का? असा सवाल करत मी राजकीय वाटेवर आले तर तुमचा खेळ खल्लास असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करियर उध्वस्त करून टाकेन असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय.
अजून किती सहकार्य करायचं?
भारतात अशी जात नसेल ज्यांना वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जात आहे आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत, आमच्यावर काही समाजाची जबाबदारी आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करत आहोत तरीसुद्धा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता ?आणि कशाला चालवतात? असा सवाल जरांगे यांनी केलाय. उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःलाच एक वर्ष आंदोलन सुरू आहे आणि आपण काहीच करू शकत नाहीयेत. असंही जरांगे म्हणाले.