जात पडताळणीचा पदभार सचिन खवले यांच्याकडे
सोलापूर ; येथील सहायक समाजकल्याण आयुक्त नागेश चौगुले यांची सांगली येथे जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य सचिवपदी पदोन्नतीने बदली झाली आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने नुकतेच सहायक आयुक्त, समाजकल्याण व तत्सम गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांना उपायुक्त, समाजकल्याण व तत्सम गट-अ संवर्गात पदोन्नती दिली आहे. यात चौगुले यांचा समावेश आहे. बुधवारी त्यांनी आपला पदभार घेतला.
चौगुले यांनी सोलापूर जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. समाजकल्याण अधिकारीपदी असताना त्यांनी जिल्हा परिषदेमधील शासनाच्या समाजातील पोहोचविणे विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत व आश्रम शाळा वसतिगृहाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीकडे विशेष लक्ष दिले होते. धाराशिव येथे शासनाच्यावतीने उत्कृष्ट कोविड-१९ योध्दा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.