एक हाडाचा पत्रकार, रक्तगट क्रिकेट पॉझिटिव्ह सांगणारा एक अवलिया, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक अतिशय अभ्यासू क्रिकेट समीक्षक म्हणजेच श्री. सुनंदन लेले जेव्हा आमच्या ऑफीसला येतात. स्वतःहून सांगतात की अनीश मी तुझ्याकडे येतोय आणि येऊन त्यांना गायडन्स देतात. त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी शेअर करतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं.
स्पाईस एन आईस चे MD अनीश सहस्रबुद्धे यांच्या मैत्री आणि प्रेमाखातर त्यांनी ही सदिच्छा भेट दिली आणि सर्व एम्प्लॉईजना हसत खेळत मार्गदर्शन केलं. अनीश आणि माझा ब्लड ग्रुप एक आहे C+ अशी स्वत:ची ओळख करुन दिली. याप्रसंगी स्पाईस एन आईस चा संपूर्ण स्टाफ आणि दै. दिव्य मराठीचे नितीन फलटणकर व नौशाद शेख उपस्थित होते .
सुनंदन लेले यांची महाराष्ट्रीय माणसाला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. क्रिकेटर, पत्रकार, यु ट्युबर, ॲडवर्टाईझिंग याचबरोबर त्यांनी इव्हेंट च्या क्षेत्रात सुद्धा उडी घेतली होती हे खूप कमी लोकांना माहीत असेल. यात यश आले नाही हे सुद्धा त्यांच्या मिश्किल स्टाईल मध्ये त्यांनी सांगितलं. त्यांच्या अनुभवाच्या खजिन्यातून अनेक किस्से सांगून त्यातून काय शिकता आलं हे सुद्धा सांगितलं.
कोणालाही कमी लेखू नये हे सांगताना त्यांनी अमिताभ यांच्या टॉप फॅन लिस्ट मधील दीक्षित यांचा किस्सा सांगितला. मार्केटिंग मधलं आपल्याला खूप कळतं या गैरसजात राहू नये हे सांगताना त्यांनी एका व्यापाऱ्याच्या मुलीच्या लग्नाचा किस्सा सांगितला.
ते स्वतः फुडी आहेत आणि इतरांनाही आनंदाने खाऊ घालतात. अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लेयर त्यांच्या घरी जेवले आहेत. त्यांची अट एकच असते आवरल्याशिवाय जायचं नाही.
मेंटॉरबद्दल सांगताना ते म्हणाले कोणी हाताला धरून शिकवलं नाही पण सतत कान, डोळे उघडे असल्याने खूप शिकता आलं. एक आहे की यशस्वी लोक जे ठरवतात ते करतातच . आपल्यालाही हे जमायला हवं
डिप्रेशन चा सामना कसा करावा हे सांगताना ते म्हणाले नेहमी दुसऱ्यांच्या दु:खाकडे बघायला शिका आणि स्वतःचे पाय कायम जमिनीवर ठेवा. आपले मित्र किंवा परिचित अशा परिस्थितीचा सामना करत असतील तर त्यांच्यासाठी वेळ काढा, वेळ निघून गेल्यावर हळहळण्याला काही अर्थ नाही.
कायम पॉझिटिव्ह राहण्याचा संदेश देऊन त्यांनी हसत खेळत सगळ्यांना निरोप दिला अशाच मोठ्या लोकांच्या आशीर्वादांनी आणि शुभेच्छांनी आज आम्ही ग्रो होतोय. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू देत.