येस न्युज मराठी नेटवर्क : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी ‘आरपार’च्या उपोषणाची घोषणा केली असून, सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आपण त्यांना मागण्या लिहून दिल्या आहेत. त्या त्यांनी २९ सप्टेंबरच्या आत सोडवायच्या आहेत. कारण आता आपण थांबू शकत नाही. आपल्या मतदारसंघनिहाय घोंगडी बैठका लागल्या आहेत. सरकारला एवढीच संधी आहे. त्यांनी आपल्या २९ सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत.”