सोलापूर : स्वयंम् शिक्षा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्यावतीने गावोगावी आणि शहरातील विविध मंदिरात श्रावण महिन्यात प्रवचन संपल्यानंतर स्वादिष्ट भोजन म्हणून महाप्रसाद वाटप करण्यात सपाटा लावला आहे.जनतेचे आशीर्वादासाठी, सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता आणि पुण्य लाभण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवित आहेत असं सांगितले जात आहे.
मंद्रूप येथील श्री मंदगोडेश्वर सिध्द आश्रमात आयोजित प्रवचनाला वैद्य उपस्थित होते.यावेळी अमोगसिध्द पुजारी,कांतू ख्याडे, विठ्ठल राठोड, सिध्दाराम काळे, मल्लिकार्जुन नंदुरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोमनाथ वैद्य म्हणाले, अतिशय गंभीर कुटुंबातून आपण स्वकर्तृत्वावर जीवनात पुढे आलो आहोत.आपल्याला सामाजाची सेवा करायची आवड आहे. गेल्या १९ वर्षापासून आपण मुंबईतील मंत्रालयात अनेक आमदारांचे स्वीय सहायक म्हणून काम केले आहे.त्यामुळे जनतेचे प्रश्न, गावोगावच्या समस्या कसे सोडवायचे आणि त्यांचा पाठपुरावा कसा करावा याचा आपल्याला मोठा अनुभव आहे.सध्या आपण गोड सुरुवात म्हणून मतदारसंघात ५१ हजार बेसन लाडू आणि गरजूंना छत्री वाटप, गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.आता श्रावण महिन्यात विविध मंदिर व मठामध्ये महाप्रसाद वाटप करीत आहोत.
आपण सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत.जर जनतेनी आपल्याला संधी दिली वडापूर येथे भीमा नदीवर धरण,सीना-भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढवू, कालव्याची दुरुस्ती करून जिथे कालवे नाहीत अशा ठिकाणी नवीन कालवे निर्माण करू. मंद्रूपला तालुका म्हणून घोषित करून येथे उच्च शिक्षणाची सुविधा, उपबाजार समिती, उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याचा संकल्प केला आहे.दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील गावोगावी आणि सोलापुरात रस्ते,वीज, पाणी आरोग्य, शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.जनतेनी एकदा सेवेची संधी दिली तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्यात आदर्श मतदारसंघ निर्माण करू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
सरपंच, सदस्य आणि नगरसेवकांना अधिवेशनाला नेणार
आपण आमदार म्हणून निवडून आल्यावर दक्षिण सोलापूर व उत्तर तालुक्यातील ६७ सरपंच व सदस्य आणि सोलापूर शहरातील नगरसेवकांना मुंबई येथील मंत्रालय तसेच मुंबई व नागपूर येथील अधिवेशनाला नेऊन प्रशासकीय कामकाजाची माहिती देणार आहोत.यामुळे त्यांना माहिती होऊन त्यांचा उपयोग गावात व शहरात कामकाज करताना फायदा होणार आहे.