सोलापूर : सोलापुरात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचे विकासात मोठे योगदान आहे. त्यांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे हिरे शोधून त्यांचा पुरस्काराने सन्मान महत्त्वाचा आहे. स्तुत्य आणि कौतुकास्पद काम अनुभव प्रतिष्ठान करीत आहे, असे गौरोद्गार बाबुराव नरुणे यांनी येथे काढले.
अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी शिवस्मारक सभागृह, नवी पेठ येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विक्रीकर उप आयुक्त ( सेवानिवृत्त) बाबुराव नरुणे, प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया अनिल सोलनकर,व्यवस्थापक (F&A)MSEB श्री ईश्वर गिडवीर , डेप्युटी मॅनेजर, एचडीफसी बँक कु.गार्गी देशपांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिष्ठान चे काम उल्लेखनीय असून तरुणांन पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. माणसाने माणसाला मदत केली पाहिजे हीच खरी माणुसकीअसते.प्रतिष्ठान ने खरच सोलापूरतीन रत्न शोधून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले ही खरी अभिमानची गोष्ट आहे. असे मत व्यक्त नरुणे यांनी माडले.
प्रस्ताविकात संस्थेचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा मांडला. सुत्रसंचालन गणेश येळमेली,सौ.प्रतिभा हवले यांनी केले तर आभार सौ श्वेता कालदीप मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाईकट्टी,संतोष शिवशिंपी,शिवानंद नागणसुरे,गणेश कालदीप,महेश कासट,मंगेश कुलकर्णी,सोमनाथ कालदीप,सचिन लोणी, अभिषेक दुलंगे,शुभम जमाणे,अजय हलकुडे,श्रवणकुमार नरोणे,राहुल बिराजदार,प्रसाद कालदीप, गोपी वंदाल, आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला पुरस्काराने गौरव !
यावेळी अभय देशमुख (उद्योजक)
गुरुलिंग कनूरकर(समाजसेवक),
ऐश्वर्या सलगर (नृत्यकला)
प्रकाश सनपूरकर(पत्रकार)
डॉ.आशुतोष यजुर्वेदी(डॉक्टर)
डॉ. प्रतिभा कालदीप (शिक्षक)
मनोज कुमार अलकुंटे (डेव्हलपर)
आशिष कुलकर्णी(GST विभाग)
श्रद्धानद पुजारी ( वकील)
सुषमा इंगळे (पोलीस)
सुमित कुडल ( IT )
आदी मान्यवरांचा अनुभव रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ,रोप या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे प्रथम वर्ष आहे.