जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात शाळेचा ४० वा वर्धापन दिन व संभाजीराव शिंदे यांची ७७ वी पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्र पवार शाळेचे प्राचार्य तथा राज्य मुख्याध्यापक मंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांची उपस्थिती लाभली.


प्रारंभी प्रमुख पाहुणे तानाजी माने सर यांच्या हस्ते संस्था संचालिका डॉ. राधिकाताई चिल्का मॅडम, मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम, शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. संभाजीराव शिंदे व संस्थेचे आधारवड आदरणीय स्व. विष्णुपंत( तात्यासाहेब) कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेविषयी गीत सादर केले.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेतील शिष्यवृत्ती, एटीएस आदी शालाबाह्य परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेविषयी कृतज्ञता पर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे तानाजी माने यांनी स्व. तात्यासाहेब कोठे आणि त्यांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या व आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले.


संभाजीराव शिंदे महिला बीएड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वीणा कणबसकर मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुकुंद ताकमोगे सर यांनी करून दिला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम यांनी सूत्रसंचालन गोपीचंद राठोड सर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर सर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी प्राचार्या डॉ. वीणा कणबस्कर मॅडम, शाळेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार सर यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली.