सोलापूर: पेनूर येथिल आर आर पाटिल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राऊंड टेबल संस्थेच्या माध्यमातून दोन मजली आठ वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली. बालाजी अमाईन्सच्यावतीने सी एस आर अंर्तगत दोन वर्ग खोल्यांचे बांधकामास मदत करण्यात आले.
बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांच्या हस्ते वर्ग खोल्यांचे उदघाटन करण्यात आले या प्रासंगी बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी राऊंड टेबल यांच्या मदतीने पेनूर येथिल शाळेची भव्य इमारत छान व सुंदर झाली असून आता या शाळेचे विदयर्थी व शिक्षकांनी या शाळेचे नाव गुणवत्ते मध्ये अग्रेसर येण्याकरीता प्रयत्न केले पाहिजे असे विचार मांडले. तसेच सोलापूर व धाराशिव जिल्हयात बालाजी अमाईन्सच्या सी एस आर माध्यामातून सध्या सुरू असलेल्या विविध कामाची माहिती दिली तसेच बालाजी अमाईन्सच्यावतीने शाळेत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची संख्या लवकरच १०० पुर्ण होईल असे यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. राऊंड टेबल यांचे वतीने रोहीत राठी यांनी बालाजी अमाईन्सच्या मदती बददल आभार व्यक्त केले.
सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल ३०९ या संस्थेच्या वतीने विविध संस्था व समाजसेवी दानशूर व्यक्ती कडून मदत घेऊन पेनूर येथिल आर आर पाटिल हायस्कूल ज्युनिअर कॉलेज येथे दोन मजली आठ वर्ग असलेली भव्य इमारत बांधण्यात आली . बालाजी अमाईन्स व पी न जी शिक्षा या दोन प्रमुख संस्था या प्रोजेक्ट मध्ये ब्लॉक डोनर होत्या .या कार्यकमास राऊंड टेबल संस्थेचे प्रोजेक्ट कन्व्हेअर पुष्कराज कोठारी, चेअरमन रेहित राठी, सेक्रेटरी अभिजित मालानी, वासुदेवजी बंग, तसेच राउंड टेबलचे सर्व पदाधिकारी आर आर पाटील हायस्कुल संस्थेचे मानाजी बापू माने शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे सर माने सर, फोफळी चे माजी सरपंच नामदेव पाटील, शिक्षक व विदयार्थी पालक वर्ग व पेनूर गावातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यकमास राऊंड टेबल संस्थेचे प्रोजेक्ट कन्व्हेअर पुष्कराज कोठारी, चेअरमन रेहित राठी, सेक्रेटरी अभिजित मालानी, वासुदेवजी बंग, तसेच राउंड टेबलचे सर्व पदाधिकारी आर आर पाटील हायस्कुल संस्थेचे मानाजी बापू माने शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे सर माने सर, फोफळी चे माजी सरपंच नामदेव पाटील, शिक्षक व विदयार्थी पालक वर्ग व पेनूर गावातील नागरिक उपस्थित होते.