सोलापूर :शहर भाजपच्यावतीने प्रभाग क्रमांक १८ मधील हनुमान मंदिर पटांगण येथे निशुल्क महासेवा शिबिर घेण्यात आले. याचा २ हजार ०१८ जणांनी लाभ घेतला.भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले.
यावेळी मोफत आधार नोंदणी व दुरुस्ती, ई-श्रम नोंदणी,आयुष्मान कार्ड, मतदान नोंदणी व दुरुस्ती, रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सेवा एकूण २०१८ लोकांसाठी देण्यात आल्या. एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळला.
शिबिरास शहराध्यक्ष नरेंद्र काळे सभागृहनेता श्रीनिवास करली, जक्कपा कांबळे,नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, सोलापूर शहरमध्य विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी महापौर श्रीकांचना यन्नम, कुरुहीनशेट्टी शालेय समिती चेअरमन प्रभाकर गोरंटी,माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल निराधार समिती माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती ,यांनी भेट दिली.
यावेळी उपाध्यक्ष भूपती कमटम, चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, व्यंकटेश कोंडी,मारेप्पा कंपली, सुनील पाताळे, यशवंत पाथरूड, प्रकाश म्हता, श्रीनिवास पुरुड,नागनाथ सोमा,रमेश यन्नम, राजशेखर येमुल,अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, अनुप अल्ले, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, विश्वनाथ प्याटी, नरेश पतंगे, सिद्धारूढ इटनाळे, रवी भवानी, नरसिंग सरला, बाळू जाधव, विजय गोरंटला, सुंचू, मनोज पिस्के,अरविंद यनगंदुल, रमेश पेंडम, आनंद आवार, वासू मादास, सुधाकर वडनाल, कुरापाटी, उमेश पामुल, विजय महिंद्रकर,ज्ञानेश्वर गवते, श्रीनिवास पोतन,अनिल वंगारी, तसेच विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.