• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन तर्फे विद्यार्थ्यांना स्कूल डेस्किट – अभिनव दप्तराचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
June 12, 2024
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन तर्फे विद्यार्थ्यांना स्कूल डेस्किट – अभिनव दप्तराचे वाटप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड च्या CSR फंडातून जिल्ह्यातील १८ शाळांतील ५०० शालेय विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण दप्तर वितरित करण्यात आले. रामवाडी येथील सोनामाता शाळेत झालेल्या कार्यक्रमात सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिध्दाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि हेमा शिंदे यांच्या हस्ते डेस्कीटचे वाटप करण्यात आले.

आयआयटी कानपूर येथील विद्यार्थ्यांनी संशोधन करून या डेस्कीटची निर्मिती केली आहे. जमिनीवर बसून अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असे हे किट आहे. बऱ्याच शाळांमध्ये बसण्यासाठी डेस्कची व्यवस्था नाही तसेच विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी टेबल खुर्ची उपलब्ध होत नाही ती अडचण या डेस्कीटच्या माध्यमातून दूर होईल. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना आनंद होईल व त्यातून अभ्यासातील प्रगती चांगली होईल अशी रचना या डेस्कीटची आहे.

या कार्यक्रमात इनोव्हेटिव्ह स्कूल, जि प बैरागवाडी, जि प मंगळवेढा वस्ती, जि प चिखली, जि प शिवाजीनगर मंगळवेढा, जि प सिद्धेवाडी पंढरपूर, कमला नेहरू स्कूल जुळे सोलापूर, जि प लांबोटी, जि प कुडल, जि प केगाव, जि प खेड, जि प कोंडी तांडा, जि प अंबिका नगर बाळे, रमाबाई आंबेडकर आश्रम शाळा निम्बर्गी, सोनामाता हायस्कूल लिमयेवाडी, जि प औडी, जि प शिवाजीनगर बाळे जि प मोडनिंब या शाळेतील विद्यार्थ्यांना डेस्कीट वितरित करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही प्रिसीजनची प्राथमिकता आहे. गरीब वंचित उपेक्षित विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यासाठी प्रिसीजन नेहमीच प्रयत्नशील असतं. सोलापूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात एक अभिनव अशी क्रांती प्रिसिजनने केली आहे, असे गौरवोद्गार सिध्दाराम माशाळे यांनी काढले. प्रिसीजनच्या वतीने सोनामाता हायस्कुल येथे आयोजित करण्यात आलेल्या “अभिनव शालेय दप्तर” अर्थात डेस्कीट वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोनामाता प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा अत्रे, विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत सोनामाता शाळेच्या शिक्षकांनी केले. सिद्धाराम माशाळे, ज्योती कालूबरमे, संतोष कुलकर्णी, महादेव भरती,नंदा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा गव्हाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनामाता शाळेतील शिक्षक विनोद शिंदे, यल्लाप्पा मानकर, सुप्रिया कुलकर्णी, स्वछता बनसोडे, अनुराधा जोशी, रेखा फुलारी रमेश बेडगे, रामचंद्र निकम, जयश्री कोळी पौर्णिमा लोखंडे यांनी परिश्रम घेतले.


काय आहे प्रिसिजन स्कूल डेस्किट (अभिनव दप्तर) :-

प्रिसिजन स्कूल डेस्किट म्हणजे हे एक अभिनव दप्तर आहे जे कि दप्तरकम डेस्क आहे. यामध्ये दप्तर व शाळेमध्ये किंवा घरात आभास करण्यासाठीचे डेस्क एकत्रित आहे. या डेस्कीट मध्ये छोटा डेस्क जोडलेला आहे जो मुलांच्या उंचीप्रमाणे ऍडजस्ट करता येऊ शकतो तसेच पुस्तकांची जागा (पुस्तकांसाठी मोठा कप्पा) स्टेशनरी पाउच (स्टेशनरी वस्तू ठेवण्यासाठी वेगळा कप्पा) बॉटल पाउच (पाण्याची बाटली ठेवण्यासाठी वेगळा कप्पा) अशा सुविधा या डेस्कीट मध्ये देण्यात आल्या आहेत. या डिस्कीटचे वैशिष्टये असे कि, या डिस्कीटच्या वापरामुळे मुलांच्या आरामदायी बसण्यामुळे एकाग्रता व अभ्यासांतील आकलन क्षमता १५ ते २० % नी वाढते. तसेच अभ्यास करताना उत्तम बसण्याची मुद्रा यामुळे ते त्यांच्या अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्यांचे हस्ताक्षर ही सुधारते.

Tags: Abhinav DaptraDistribution of school deskPrecision
Previous Post

खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा

Next Post

आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026