सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आल्यानंतर महायुतीकडून आमदार रामभाऊ सातपुते यांच्यासाठी व महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या समर्थन मिळविण्याकरिता एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्याकडे बरेच प्रयत्न झाले. अशा बिकट परिस्थितीत कोगनुरे यांनी महाविकासची साथ निवडत प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रचार करण्याचा निर्णय घेतला. सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीत ऐत्याहासिक विजय मिळविला. कोगनुरे यांच्या निर्णयाचे व दूरदृष्टीचे कौतुक सध्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात होत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेल्यानंतर कोगनुरे यांनी दिवस रात्र एक करुन एम. के. फाउंडेशनच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला. सोलापुरातून प्रणिती शिंदे या भरघोस मतांनी विजयी होताच महादेव कोगनुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला आहे. महादेव कोगनुरे व एम. के. फाउंडेशनच्यावतीने खासदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
मोठ्या जबाबदारीची शक्यता
कोगनुरे यापूर्वी ही माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासमवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोगनुरे यांनी केलेला पहिला प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. कोगनुरे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.