• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2024
in इतर घडामोडी
0
हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय
0
SHARES
1
VIEWS

रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव : पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा समारोप उत्साहात

सोलापूर हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी शनिवारी झालेल्या प्रांत संघ शिक्षा वर्ग समारोप समारंभात केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी सायंकाळी ह. दे. प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात झाला.

१७ मे ते १ जून दरम्यान रा. स्व संघाचा सोलापूरसह, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सात जिल्ह्यांसाठीचा पश्चिम महाराष्ट्र निवासी संघ शिक्षा वर्ग झाला. या वर्गाच्या समारोपाप्रसंगी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वामसी लॅब लिमिटेडचे सी.एम.केशवा रेड्डी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर, वर्गकार्यवाह राहुल पुंडे, वर्गपालक दीपक काळे, सोलापूर शहराचे शहर संघचालक राजेंद्रसा काटवे उपस्थित होते.

प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर संघ प्रार्थना झाली. तसेच संघाच्या संचलनातील ‘प्रत्युत् प्रचलनम् ‘ चे प्रात्यक्षिक करण्यात आले. यानंतर ‘प्रदक्षिणा संचलनम् ‘ करत रा. स्व. संघाच्या गुरुस्थानी असलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजास संचलनाद्वारे प्रदक्षिणा घालण्यात आली. यानंतर १५ दिवसीय संघ शिक्षा वर्गात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या घोषवादन, पदविन्यास, दंड युद्ध, नियुद्ध, योगासन, सामूहिक पद्यगायन या दिलेल्या प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी दाद दिली. यानंतर “तप निरंतर चल रहा है,संघ बढता जा रहा है” हे वैयक्तिक गीत सादर करण्यात आले.
यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव म्हणाले, देशाचे प्रश्न किंवा समस्या सांगण्यापेक्षा समस्या सोडवणारा समाज व्हावा अशी संघाची भूमिका आहे. संघाच्या वर्गातून सहजीवन, सहकाराचा संस्कार होतो. संघवर्ग म्हणजे पक्के देशभक्त तयार करण्याची भट्टी आहे. ज्यात तयार झालेले स्वयंसेवक न सांगता देशकर्तव्य पार पाडतात. देशासमोर सध्या वैचारिक, आर्थिक व सामाजिक आव्हाने असल्याचा देखील उल्लेख नानासाहेब जाधव यांनी यावेळी केला.
यावेळी एम. केशवा रेड्डी म्हणाले, रा. स्व. संघ ही देशासाठी निस्वार्थपणे काम करणारी संघटना आहे. गेली ९८ वर्षे संघावर टीका झाली परंतु संघ निरंतर कार्यरत राहिला. आता संघ आणखी वाढत आहे. मजबूत पायाच्या आधारावर संघ देशभक्तांची तयार करत आहे.
संघ प्रशिक्षण शिबिराचे कार्यवाह राहुलजी पुंडे यांनी प्रास्ताविक करताना सहभागी स्वयंसेवक व शिबिराची माहिती उपस्थितांना विस्तृतपणे दिली.वर्ग कार्यवाह राहुलजी पुंडे यांनी आभार प्रदर्शन केले. ध्वजावतरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमास सोलापूरसह, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षण वर्गात ग्रामीण भागातून १०० तर शहरी भागातून २५७ स्वयंसेवक सहभागी झाले होते.रा.स्व. संघाच्या २७२ शाखामधून हे स्वयंसेवक सहभागी झाले होते.यापैकी १०० शिक्षार्थी हे १० व १२ वी परीक्षा देऊन सहभागी झाले होते.त्यांनी वर्गातूनच आपला निकाल जाणून घेतला. प्रशिक्षण कालावधीत १७ दिवस स्वयंसेवकांना भ्रमणध्वनीपासून दूर ठेवण्यात आले होते.

या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी ओला व सुका कचऱ्यापासून जवळपास १००० पेक्षा जास्त इकोब्रिक्स तयार केले होते. स्वयंसेवकांनी तयार करण्यात आलेल्या या इको ब्रिक्स महापालिका प्रशासनास भेट देऊन त्याची माहिती देण्यात येणार आहे.याबरोबरच ३ हजारपेक्षा जास्त सीडबॉल्स तयार करण्यात आले.

Previous Post

IPL 2024 क्रिकेट सट्टावर पोलिसांची धाड, ३ आरोपींना शहर गुन्हे शाखेकडून अटक

Next Post

संत मुक्ताई संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
Next Post
संत मुक्ताई संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

संत मुक्ताई संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026