योग आराधना योगा क्लासेस यांच्यातर्फे प्रसन्न मल्टीपर्पज हॉल वसंत विहार येथे महिला व मुली यांच्याकरीता दिनांक 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2024 या कालावधीत विशेष मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रसन्न मल्टीपर्पज हॉलचे मालक प्रसन्न नाझरेसर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई हॉस्पिटलचे डॉक्टर सारिका उंबरे, पतंजली योग प्रशिक्षक भगवान बनसोडे सर व प्रसन्न ग्लोबल स्कूलचे प्रिन्सिपल दिपाली पवार मॅडम उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर उंबरे यांनी महिलांना योग व प्राणायम किती आवश्यक आहे याची माहिती दिली. योग प्रशिक्षक बनसोडे सर यांनी महिलांना ताणतणावामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे महिलांनी आजार होण्यापूर्वीच योग व प्राणायाम एकत्रित नियमित केल्यास त्याचा फायदा त्यांना होऊन आजार होणार नाहीत असे सांगितले. प्रसन्न नाझरे सर यांनी अध्यक्षीय भाषणात योग प्राणायाम याचे महत्त्व सांगून परिसरातील महिलांना मोफत शिबिराचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार योग प्रशिक्षक सोनिया खपाले यांनी मानले तर सूत्रसंचालन समृद्धी खपाले यांनी केले.यावेळी परिसरातील मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्य महिला व मुली उपस्थित होत्या.