सोलापूर – सुरक्षितपणे काम करण्यासाठी जागरूकता आणि वचनबद्धता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दरवर्षी 4 मार्च ते १० मार्च दरम्यान साजरा केला जातो. याचा उद्देश कर्मचाऱ्यांना वर्षभर सुरक्षितपणे काम करण्यासाठी प्रेरणा देणे, कौशल्य निर्माण करणे या उद्देशाच्या पूर्ततेसाठी विविद कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनी मध्ये ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला त्यावेळी कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा शपथ घेतली. प्रिसिजनमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षा विषयात प्रशिक्षण दिले जाते.रस्ता सुरक्षा, काम करत असताना वैयक्तिक घ्यायची काळजी, स्वतः नियमांचे पालन केले तरच शून्य अपघाताचे ध्येय गाठता येईल यातूनच कंपनीमधील वातावरण अधिक सुरक्षित राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
“ESG उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करा” ही यावर्षीची सुरक्षा सप्ताहाची थीम होती. ESG म्हणजेच इन्व्हायर्मेंट, सोशल आणि गव्हर्नन्स या तत्त्वांचे महत्त्वपूर्ण एकत्रीकरण अधोरेखित करणे. या थीमला अनुसरून संपूर्ण सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, सुरक्षा घोषवाक्य स्पर्धा,सुरक्षा पोस्टर स्पर्धा, सुरक्षा कविता व प्रश्नमंजुषा अशा स्पर्धांचे आयोजन कर्नाय्त आले होते. सोबतच संपूर्ण सुरक्षा सप्ताहात प्रत्येक विभागात सुरक्षा साधनांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते, तसेच कपंनीतील सर्व वाहनचालकांना रोड सेफ्टी, वाहतुकीदरम्यान घ्यायची काळजी, वाहतुकीचे नियम या विषयात मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्वरीत प्रतिसाद देणाऱ्या ERT (इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) सदस्यांना फायर फायटिंग” प्रशिक्षण देण्यात आले.आरोग्य, पर्यावरण तसेच वैयक्तिक सुरक्षा साधने यांच्या वापराचे महत्व ESG उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्व याचे महत्व कर्मचाऱ्यांना कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक सुहास पाटील यांनी सांगितले. यावेळी कंपनीमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.