सोलापूर: डॉ. शितल राठोड यांनी नुकतेच भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीटीकल केअर मेडिसीन सुपर स्पेशालिटी परिक्षेत विशेष प्राविण्यासह यश मिळविले आहे. डॉ. शितल राठोड याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगली शहारात झाले असून वैद्यकीय पदवी मुंबईच्या केईएम वैद्यकीय महाविद्यालय येथून घेतली आहे. तर पदवीउत्तर वैद्यकीय शिक्षण एमडी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पूर्ण केले आहे.
क्रिटिकल केअर मेडिसिन सुपर स्पेशलिटी येथे पुर्ण केले आहे.क्रिटिकल केअर मेडिसिन सुपर स्पेशलिटी या क्षेत्रामध्ये राज्यातील बंजारा समाजातील त्या पहिला महिला आहेत .सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉ : योगेश राठोड यांच्या त्या सुविधय पत्नी आहेत. लवकरच त्या सोलापूर रुग्णांच्या सेवेत रुजू होणार आहेत अशी माहिती क्रीटीकल केअर मेडिसीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक युवराज राठोड यांनी दिली आहे.
डॉ. सी. बी. पवार, आई अनिता पवार, डॉ. योगेश राठोड, बहीण डॉ. कोमल पवार, डॉ. वैभव पवार डॉ.सरोज चव्हाण, डॉ दिलीप चव्हाण यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा चा वर्षाव केला आहे.