सोलापूर : लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा ११ वा वर्धापन दिन आिण महिला दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कोमल रोहन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.अन्नपूर्णा योजने अंतर्गत ६० वर्षा पुढील निराधार ५०० लाेकांना मोफत जेवण दिले जाते तसेच सिव्हील हॉस्पिटल येथील ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनाही जेवण दिले जाते आतापर्यंत ११ वर्षात एकूण १३ लाख ७४ हजार ,३४५ डबे देण्यात आले आहेत. अन्नपूर्णा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना बोलवून त्यांचा लोकमंगल फाउंडेशन मार्फत सन्मान करण्यात आला आ.सुभाष देशमुख यांनी महिलांशी संवाद साधून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी प्रणिता पंपटवार (दुचाकी प्रशिक्षिका), अनुराधा सोमा (हाऊस ऑफ पराठा), उषाताई बाम्हणे (सामाजिक कार्यकर्ता), डॉ .शशिकला जगताप (सिव्हिल हॉस्पिटल), डॉ.अग्रजा सिव्हील हॉस्पिटल) प्रा.शरणार्थी मॅडम (बालगृह शिक्षिका), जोशी (संगीत शिक्षिका) यांच्यासह अन्नपूर्णा योजनेतील स्वयंपाक करणाऱ्या महिलांंचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी महिलांसाठी स्पर्धा आयोजित करून त्यांना पारितोषिक देण्यात आले .