पाण्याची टँकर व चारा छावण्या चालु करा
आ. प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांकडे केली मागणी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी सरासरी पेक्षा खुप कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये पाऊसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.
त्यामुळे शासनाने तत्काळ मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करण्यात यावा. तसेच कमी पाऊसामुळे जनावरांच्या चारा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे गावांमध्ये पाण्याची व जनावरांकरीता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. याकरीता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहिर करून पाण्याचे टँकर सुरू करणे व जनावरांच्या चारा छावण्यासह दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सुविधा तात्काळ मंगळवेढा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन साहेब यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.