उत्कट कार्य, समर्पित प्रयत्न, आणि संवेदनांचा त्रिवेणी संगम : डॉ दीपाली काळे.
सोलापूर : शिक्षकांचे उत्कट कार्य आणि विद्यार्थ्यांचे समर्पित प्रयत्न तसेच सामाजिक संवेदना जाणणारी रोटरी संघटना, हा त्रिवेणी संगम आहे असे विचार सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे यांनी व्यक्त केले. आपण घेत असलेली मेहनत, तपश्चर्या, विद्यार्थ्यांप्रति असणारी आपुलकी, यांनी मला निःशब्द केलं असेही त्या म्हणाल्या.
रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागतोपर सत्कार केला. महान विदुषी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रोटेरियन पूनम देवदास यांनी करून दिला. शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन डॉ दीपाली काळे यांना गौरविण्यात आले. तसेच महिला दिनानिमित्त एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष महिला म्हणून पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील आणि रोटरी नॉर्थ च्या महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुनील दावडा, बळीराम पावडे, दौलत सिताफले, डॉ निहार बुरटे, डॉ मधुरा बुरटे, आसावरी सराफ, पूनम देवदास, वंदना कोपकर, आरती गांधी, डॉ किरण सारडा, डॉ. ललिता शितोळे, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, सैपन बागवान, अजित पाटील, साहेबगौडा पाटील, गंगाधर मदभावी, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैपन बागवान यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.