म न पा मुले क्र 27 शाळेच्या शैक्षणिक सहली मधून मुलांना सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक तसेच पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली.
माचनूर येथे 27 फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर दर्शन घेऊन व भीमा नदी पाहून ही सहल गोपाळपूर येथे गोपाळ कृष्णाचे दर्शन घेऊन पंढरपूर येथे रवाना झाली.
पंढरपूरला चंद्रभागा नदीचे दर्शन, भक्त पुंडलिकाचे दर्शन, विठ्ठलाचे दर्शन व त्यानंतर कैकाडी महाराजांच्या मठ पाहण्यासाठी पाहून मुले खुश झाली. त्यानंतर दुपारच्या सत्रात अकलूज येथे आनंदी बाल गणेश यांचे दर्शन घेऊन मुलांनी शिवसृष्टी पाहिली. शिवसृष्टीमध्ये सर्व शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचे बालपण /नामकरण; शाहीस्ते खानाची फजिती; शर्तीने खिंड लढवणेरे बाजीप्रभू ;यांचा इतिहास व शेवटी राज्याभिषेक सोहळा पाहून मुलांना शिवाजी महाराजांच्या कार्याची महती समजली.
अकलाई मंदिरात दर्शन घेऊन झोके तसेच सी साॅ व आणि पाळण्यात बसवण्याचा मुलांनी आनंद घेतला. ही सहल यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नवले सहशिक्षिका चौगुले व सह शिक्षक जगताप सर सह शिक्षिका शेख मॅडम त्याचबरोबर जाधव मावशी या सर्वांनी परिश्रम घेतले