सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३७६, ५०६ अन्वये दंडनीय गुन्ह्यासाठी गुन्हा क्र. २२/२०२४ च्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३९ नुसार जामिनासाठी दाखल केला होता.
या प्रकरणातील पिडित ही विवाहित महिला आहे. आरोपी आकाश राजपूत हा पोलीस खात्यात कॉन्स्टेबल आहे. दिनांक १०.०१.२०२४ रोजी आरोपी हा पिडीतेचा पती आणि सासू यांच्या सुरक्षेसाठी रक्षक म्हणून दिलेला होता. आरोपी आकाश राजपूत याने पिडीतेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला कॉल आणि मेसेज करायचा. दिनांक २४.०८.२०२३ रोजी आरोपी आकाश राजपूतने फिर्यादीला ‘आय लव्ह यू’, “यु लव्ह मी?” असा मजकूर संदेश पाठवला आणि त्यानंतर तिला फोन केला आणि तिला सांगितले की, “तू मला आवडतेस आणि तिच्याशी प्रेमसंबंध ठेवू इच्छितो.” त्योवेळी पिडीतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दिनांक २७.०८.२०२३ रोजी पिडीतेच्या भावाच्या घरी कार्यक्रम होता. तेंव्हा फिर्यादी, पती आणि सासूसह तेथे गेली. रात्री ०९.०० वा. च्या सुमारास, पिडीता आपल्या मुलीची तपासणी करण्यासाठी घरी आली, त्यावेळी पिडीतेच्या पतीने तिला दोन कप चहा बनवायला सांगितल्याच्या बहाण्याने आरोपी आकाश राजपूत हा फिर्यादीचा पाठलाग करत आला. जेव्हा फिर्यादी ही स्वयंपाकघरात गेली तेव्हा आरोपी हा पिडीतेच्या मागे गेला व फिर्यादीवर जबरदस्ती करून तिचे फोटो क्लिक केले आणि जबरदस्तीने व्हीडीओ काढले. पिडीतेला तिच्या सासूच्या खोलीत जबरदस्तीने नेवून आरोपी आकाश राजपूतने पिडीतेला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले.त्यामुळे पिडीतेने आरडा-ओरडा केला. त्यानंतर आरोपीने २-३ दिवसांनी पिडीतेला फोन करून तिला एका हायस्कूलच्या मैदानावर तिचे फोटो आणि व्हिडिओ हटवण्याच्या बहाण्याने बोलावले आणि ती तेथे गेल्यावर त्याने तिला जबरदस्तीने जुन्या एका चौकातील त्याच्या नातेवाईकाच्या कार्यालयात नेले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी त्याने पिडीतेचे फोटो आणि व्हिडिओ वायरल करण्याची, पतीला जीवे मारण्याची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडीतेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. शेवटी पिडीतेने आरोपी आकाश राजपूत याच्या त्रासाला कंटाळून आरोपी विरुद्ध दिनांक १०.०१.२०२४ रोजी सदर बझार पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद दाखल केली असता पोलीसांनी या आरोपी पोलीसास शिताफीने अटक करून तपास केला.
या प्रकरणात शासनातर्फे सर्व हकीकत योग्यरीत्या मा. न्यायालयापुढे सांगितली तसेच पिडीता, पंच, घटनास्थळचा पंचनामा, पिडीतेचे व आरोपीचे कपडे, वैदयकिय अधिकारी यांचा अहवाल, जप्त केलेले आरोपी व पिडीतेचा मोबाईल फोन, सी.डी.आर., एस.डी. आर. रिपोर्ट इत्यादी प्रकारचे भक्कम पुरावे मा. न्यायालयासमोर आहेत. यात जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद असा की, अर्जदारावर नोंदवलेला गुन्हा त्याला पूर्णपणे लागू आहे, तपास सुरू आहे, अशा परिस्थितीत अर्जदाराची जामिनावर सुटका झाली तर तो दूर पळून फरार होईल. आरोपी हा पोलीस असल्याने तो सुरळीत तपासात अडथळा निर्माण करेल आणि तपासात अडथळे निर्माण करेल, आरोपी हा पोलीस यंत्रणेला सहकार्य करणार नाही, आरोपी हा फिर्यादी साक्षीदारांवर दबाव आणेल, खटल्याच्या वेळी तो न्यायालयात हजर राहणार नाही आरोपीवर यापुर्वी एक गुन्हा दाखल आहे. आरोपी हा पिडीतेच्या नव-याचा अंगरक्षक असताना त्याने रक्षण करण्याचे कार्य सोडून पिडीतेवर अत्याचार करून विश्वासघात करून आरोपीने पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन केली आहे. अशा प्रकारचे गुन्हे आरोपीकडून पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणास्तव सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी मा न्यायालयास आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली.
तसेच सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी असे सादर केले की, जामीन अर्जामध्ये सहमती संबंधीच्या सिद्धांताचा उल्लेख केलेला नाही. अर्जदार आरोपी हा पोलिस कर्मचारी असून त्याला कायद्यातील तरतुदीची चांगली माहिती आहे, आरोपी आकाश राजपूत हा पिडीतेचा पती व सासू-सासऱ्यांचा रक्षक म्हणून काम पाहत होता. हे F.I.R वरून स्पष्ट होते. तसेच दि. २४.०८.२०२३ रोजी अर्जदार/आरोपीने पिडीतेसोबत जबरदस्ती केली व तिचे फोटो आणि व्हीडीओ काढले. आतापर्यंत दिनांक ०४.०९.२०२३ च्या घटनेपर्यंत पिडीतेला आरोपी आकाश राजपूत हा तिचे छायाचित्र आणि व्हिडिओ हटविण्याच्या बहाण्याने बोलावत होता. आरोपी हा पिडीतेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल तसेच पिडीतेच्या पतीला ठार मारेल किंवा त्माला खोट्या केसमध्ये अडकवेल, अशी धमकी दिली आहे. संमती तयार करण्यासाठी हे अनिवार्य आहे की, संमती कोणत्याही धमकीशिवाय, बळजबरी किंवा अनुचित लाभाशिवाय मुक्त असणे आवश्यक आहे. केवळ अशा परिस्थितीत पिडीतेने तिच्या पतीला किंवा कुटुंबातील सदस्यांना किंवा कोणासही घटना उघड केली नाही म्हणून, पिडीतेने आरोपी याच्याशी संबंध ठेवण्यास संमती दिली असे म्हणता येणार नाही.
तसेच सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड, प्रदिपसिंग राजपूत यांनी असेही सादर केले की, आरोपी आकाश राजपूत विरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे, आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे .तसेच वैद्यकीय तपासणीच्या वेळीही फिर्यादीने डॉक्टरांना घडलेला प्रकार उघड केला, या कारणास्तव त्यांनी जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. एस. आर. शिंदे जिल्हा व सत्र न्यायाधीश-३, सोलापूर यांनी या गुन्ह्यातील आरोपी आकाश राजपूत याचा जामिन अर्ज फेटाळला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील . प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. ए. एस. औटी व अॅड. डी. ही कापूरे यांनी काम पाहिले…