जुनी मील आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी मुख्याध्यापक नागेशकुमार काटकर सर, मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम यांच्या उपस्थितीत मान्यवर पालकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक स्व.विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
हा कार्यक्रम इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रवण थोरात या विद्यार्थ्याने भूषविले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. मोहसीन शेख, सुभान शेख या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनातील थरारक प्रसंगाचे पोवाडे गायले.राजनंदिनी गायकवाड या विद्यार्थिनीने महाराजांविषयी गीत गायले.विद्यार्थ्यांनी शिव जन्माचा पाळणा कार्यक्रम साजरा केला.
बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नेत्रदीपक कार्यक्रम सादर केला.
मुख्याध्यापक काटकर सर यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापकांच्या हस्ते कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पेन देण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती पाटील मॅडम, अंजली उंबरगीकर मॅडम व नीलकंठ पटणे सर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोहसीन शेख याने केले तर आभार प्रदर्शन वैभवी रुपनर या विद्यार्थिनीने केले.