सोलापूर : होटगी मठाचे परमपूज्य श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री बृहन्मठ होटगी काशीपीठाचे संस्थेच्या वतीने जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन बिश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे अध्यक्ष श्री.ष.ब्र. चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शुक्रवारी (दि.२) अक्कलकोट रोड येथील एस. व्ही.सी.एस. डी.एड्. कॉलेज येथे वक्तृत्व स्पर्धा, श्लोक पाठांतर स्पर्धा, शनिवारी (दि.३) रांगोळी व चित्रकला स्पर्धा, मंगळवारी (दि.६) पहाटे ०२.१० वाजता उत्तर कसब्यातील होटगी मठात व होटगी येथील मठात शिवाचार्याच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करण्यात येणारआहे. पहाटे ५ वाजता काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात श्री.प.ब्र. चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे आत्मज्योत शिरावर घेऊन हजारो भक्तगणांच्या समवेत भक्तिमय वातावरणात उत्तर कसब्यातील होटगी मठातून मौजे होटगी (ता.द. सोलापूर) कडे सवाद्य मिरवणुकीने मार्गस्थ होणार आहे.
बाळीवेस येथील मठात सोमवारी (दि.५) श्री गुरु गादीस संगीत रूद्रमहापूजा, सहस्त्र बिल्वार्चन व सायं ६ वाजता शिवाचार्याच्या सान्निध्यात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ८ वाजता संगीत संध्या व रात्री १० वाजता भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. शुक्रवार (दि.२६ जानेवारी) ते सोमवार (दि.०५ फेब्रुवारी) पर्यंत बाळीवेस व होटगी येथे दुपारी श्री सिद्धान्त शिखामणी पारायण व होटगी येथे प्रवचन तसेच बाळीवेस मठात भजन, भारुड व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.