सोलापूर : सिंहगड इन्स्टिटयूटस, सोलापूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद व मल्टी मेगा इव्हेंट चे आयोजन. ‘रेशीम उद्योगाचा प्रभावी वापर या विषयावर आधारीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट व भूविज्ञान संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान रेशीम उत्पादन व अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयाशी निगडित “ए मल्टी मेगा इव्हेंट ऑन इंनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत” चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंहगड इन्स्टिट्यूटचे सहसचिव संजय नवले, सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट चे डायरेक्टर, व डी. वाय पाटील विद्यपीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी एच. पवार व एन. बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. शंकर डी. नवले यांनी अशी माहिती दिली. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या मल्टी मेगा इव्हेंट च्या आयोजना संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. एस. एच. पवार यांनी सांगितले की रेशीम कोळी व रेशीम किडे यापासून मिळणारे रेशीम म्हणजेच सिल्क हे पदार्थविज्ञान संशोधनासाठी महत्वाचा घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सिल्क हे प्रोटिन्स ने समृद्ध असल्यामुळे व त्याच्या असलेल्या विशिष्ठ जैवगुणधर्मामुळे ते इतर पॉलिमर्स पेक्षा सरस ठरते.
या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमुळे ‘सिल्क सायन्स व टेक्नॉलॉजी’ ला नवा आयाम मिळणार असून नवसंशोधकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नवउद्योजकांसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे. या अंतर्गत ‘सिल्क फाईब्रॉईन’ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद’ ‘विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, सिल्क सायन्स या विषयावर प्रदर्शन, ‘डिस्टा २०२४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन या निमित्ताने केले जाणार असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध कमिटी बनवण्यात आल्या आहेत.
संपूर्ण कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, सिंहगड इन्स्टिट्यूट चे सहसचिव तथा कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले व ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर डी. नवले, डॉ. व्ही. पी. धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमाचे नियोजन आखण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला उपप्राचार्य डॉ. एस. एम. जगदे उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. डी. डी. कुलकर्णी व डॉ. दत्ता नवले. उपस्थित होते.