मराठा सेवा संघ झेडपी शाखेतर्फे कर्तृत्ववान १३ महिलांचा सन्मान
सोलापूर : राजमाता जिजाऊ यांचे मुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले, जिजाऊंचे आठवावे रूप व जिजाऊंचा आठवावा प्रताप..! जिजाऊ यांचे स्वराज्य निर्मिती साठी मोठे योगदान आहे असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मांडले. जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्वमान महिलांच्या सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले,कार्यकारी अभियंता सुनील कलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे,कृषि विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ व सावित्री लेकींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यांत आला. त्यानंतर विविध क्षेत्रात सन्मान केलेल्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. या कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्र) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, माध्यमीक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिता बांगर, कृषि अधिकारी दिपाली शेंडे, पत्रकार रेणूका वठारे, वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक ( लेखा) नम्रता मिठ्ठा, कनिष्ठ अभियंता मयुरी जावळकोटी, अंगणवाडी पर्यवेक्षीका वसुधंरा जिंदे, ग्रामसेविका सुरेखा सरवळे, प्राथमिक शिक्षिका ओमदेवी घंटे, परिचर छाया क्षीरसागर यांचा सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते कर्तृत्ववान १३ महिलांचा गौरव करणेत आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले. व ख्यातमान गीतकार मोहम्मद अय्याज यांच्या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमास कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना अध्यक्ष वाय पी कांबळे, शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख, काशीनाथ बिराजदार, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तजमूल मुतवल्ली, राजेश देशपांडे, विवेक लिंगराज, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी, ग्रामसेवक संघटनेचे शिवाजीराव गवळी, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिरुद्ध पवार व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विशाल भांगे, रोहीत घुले,वासुदेव घाडगे अभिजीत निचळ, आप्पासाहेब भोसले, सचिन पवार, सचिन साळुंखे, सचिन चव्हाण, राम जगदाळे, सुधाकर माने, देशमुख विशाल घोगरे, गणेश साळुंखे, विकास भांगे सूर्यकांत मोहिते, सुहास चेळेकर , आनंद साठे, विष्णू पाटील,अविनाश भोसले, हरिभाऊ देशमुख उमेश खंडागळे, अजय चव्हाण, ऋषिकेश जाधव,राहुल शिंदे जयंत पाटील , प्रभाकर माने, भूषण काळे, विकास खंडागळे, प्रकाश शेंडगे, गोपाळ शिंदे, लक्ष्मण अडसुळ, सर्जेराव गाडेकर, विठ्ठल मलपे, उमेश मोरे, आप्पासाहेब सरवळे, अशोक मोरे, अजीत देशमुख, सुभाष तणमोर, संजय डोके, रविंद्र शेंडगे,अश्विनी सातपुते, सविता मिसाळ, सुनिता भुसारे, ज्योत्सा साठे, शुभांगी गवळी, माधुरी भोसले, सुचिता जाधव, अनुपमा पडवळे, प्रतिक्षा गोडसे, भारती धुमाळ, सोनल केत,लक्ष्मी शिंदे . ज्योती लामकाने, माधुरी सुरवसे , यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जिजाऊंचा आठवावा प्रताप- सिईओ मनिषा आव्हाळे
………..
जिजांनी केवळ शिवबांना घडविले नाही तर चांगले सुशासन देणे साठी त्यांनी मेहनत घेतली. जिजाऊंचे आठवावे रूप व जिजाऊंचा आठवावा प्रताप असे म्हणावे लागेल. जिजाऊ चे कर्तृत्व महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले बांधले, रस्ते बांधले, विकास केला त्याच बरोबर अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. चांगले सुशासन निर्माण केले. असे सांगून जिजाऊ जयंती निमित्त चांगले उपक्रम राबविले बद्दल सेवा संघास सिईओ मनिषा आव्हाळे यांनी धन्यवाद दिले.
रक्तदान शिबिराला जोरदार प्रतिसाद
यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला जोरदार प्रतिसाद मिळाला.