टेंभूर्णी -कोरोनोसदृश्य परिस्थितीत लाॅकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यातील फळबाग शेतकर्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याकडे शासनाने गांभिर्यपूर्वक लक्ष देवून नुकसान भरपाई द्यावी.असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्य प्रा सुहास पाटील यांनी केले आहे.
टेंभूर्णी,बेंबळे,मोडनिंब,कोंढारभाग व कंदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केळी,खरबुज,कलिंगड,द्रांक्ष बागांची शेतकर्यांनी लागवडी केल्या आहेत.देशभर लाॅकडाऊनमुळे व्यापारी शेतकर्यांकडुन ३ हजार रूपये टनांने अशा कवडी मोल भावाने खरेदी करत आहे.मागील पंधरा दिवसापूर्वी हाच दर १४ ते १५ हजार रूपये टन होता.कोरोनोमुळे ऊदभवलेल्या परिस्थितीचा फायदा पुणे,मुंबई येथील व्यापारी घेत आहेत.स्थानिक व्यापार्यांना हाताशी धरून २ ते ३ हजार रूपये टन अशा कमी दरात केळी घेऊन शहरात तीच केळी १२ ते १५ हजार रूपये टनाने विकतात.व्यापारीच टनाला १० हजार रूपये मिळवायला लागलेला आहे.स्थानिक व्यापारी शेतकरी पुत्रच आहेत.त्यांनी जर एकी करून दोन दिवस केळी मार्केट बंद ठेवले तर पुणे,मुबंईचे व्यापारी केळीला चांगले दर देतील.त्यामुळे शेतकरी नुकसानीपासुन वाचेल.असेच सर्व पिकांच्याबाबत होत आहे.शेतकर्याला कलिंगड,खरबुज,द्राक्षे व भाजीपाला कवडीमोल किंमतीला विकावा लागत आहे.त्यासाठी माझी शासनाकडे विनंती असेल की,व्यापार्यांची नफेखोरी मोडून काढून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान टाळावे.तसेच शेतकर्यांच्या फळबांगांना ऊत्पादित झालेल्या मालाला अनुदान देण्यात यावे.यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहीजेत.”आजही पुणे,सोलापूर शहरात किरकोळ केळीचा दर ४० ते ५० रूपये डझन आहे.म्हणजेच कसलाच दर कमी झाला नसताना व्यापारीच शेतकर्यांकडून कमी दराने खरेदी करीत आहेत.याकडे शासनाने लक्ष द्यावे.” सध्या शेतकरी युवकांनी कंबर कसत पारंपारीक शेतीमध्ये बदल करीत मच्लिंग पेपर टाकुन शेती ऊत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत.जर या युवकांची शेतीमध्ये घोरनिराशा झाली तर पुन्हा तो शेती व्यवसायातुन माघारी फिरेल.म्हणून कर्ज काढून,ऊसनेपासने पैसे घेवून शेती करणार्या शेतकर्यांचे आज कोरोनो सदृश्यपरिस्थितीमुळे कंबरडेच मोडले आहे.याचा शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करून फळबागांच्या होणार्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.