• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2023
in इतर घडामोडी
0
१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’
0
SHARES
1
VIEWS

सोलापूरसह २२ केंद्रांवर ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव

सोलापूर (प्रतिनिधी) रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,मुंबई आयोजित,नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.
‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,पुणे,नाशिक,जळगाव,धुळे,अहमदनगर,बीड,नांदेड,लातूर,औरंगाबाद,अकोला,अमरावती, नागपूर,चंद्रपूर,वाशिम,ठाणे,नवीमुंबई,मुंबई येथे होणार आहे.यात एकांकिका स्पर्धा,बालनाट्य स्पर्धा,एकपात्री स्पर्धा,नाट्य अभिवाचन स्पर्धा,नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे.ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे.१५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे व त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक,अभिनेते,अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे.तसेच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस देखील भरघोस अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत , तंत्रज्ञ यांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे.एकांकिकेसाठी प्रवेश फी रू. १०००/- तर बालनाट्यासाठी रू. ५००/- व इतर सर्व स्पर्धांसाठी रू. १००/- राहील.
या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विविध स्पर्धांची माहिती, नियामवली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख व सहयोगी प्रमुख यांच्या संपर्क क्रमांक वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्थां, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ – जिल्हा पुरवठा अधिकारी

Next Post

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार – धनंजय मुंडे

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार – धनंजय मुंडे

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार - धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026