सोलापूर : सोलापुरातील जरिया फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल पैलवान सिकंदर शेख यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पैलवान सिकंदर शेख यांचा मोठ्या थाटामाटात सोलापूरच्या पावन नगरीत आगमन झाले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी पैलवान सिकंदर शेख यांचा सत्कार केले..महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता सिकंदर शेखचा सत्कार सोलापूर शहर मध्ये च्या आमदार मा. प्रणिती शिंदे यांनी केला.राज्य कुस्तीगीर संघ (अस्थायी समिती) आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या पैलवान सिकंदर शेख याचा आमदार प्रणिती शिंदे,आणि जरिय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजीब शेख यांनी सत्कार केला.
कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात 66 व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 22 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले.
सोलापूर शहरांमध्ये पैलवान सिकंदर शेख याचे तसेच , मराठवाडा केसरी पैलवान अतिश मोरे.,नागनाथ केसरी पैलवान जुनेद शेख , पैलवान अश्फाक अप्पालाला शेख, पैलवान हुसेन पटेल, या आलेल्या पैलवानांचा सत्कार यावेळी करण्यात आला ,तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, समाजसेवक मतीन बागवान, काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरैशी, शोएब महागामी, युथ प्राईड ग्रुप चे अध्यक्ष समीर शेख, इफ्तेकार तुळजापूरे, सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले,यांसह सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच या भव्य सत्कार समारंभाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हा सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजहर हरकारे,हाजी माज कामले, इकबाल कामले , अल्ताफ बागवान साबीर पिरजादे, मजहर मणियार,हाजी रब्बानी कुरेशी, कासिब बेलीफ , समी शिलेदार, अरबाज मुल्ला, इकबाल बाउंड, मुबीन बडेपिर,ताजअहमद,यासीन नाईकवाडी, जुनेद वळसंकर,मोसिन खान तसेच जरीया फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठे परिश्रम घेतले…