सोलापूर : शहरातील जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या कोमल ढोबळे यांच्या हस्ते महाआरती करून अन्नदान करण्यात आले. यावेळी भाविकांकडून मंदीर परिसरात दीप लावून दीपोत्सव करण्यात आला.
जुनी पोलिस लाईन येथील श्री स्वामी समर्थ मंदीर येथे दिवाळीच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या पाडवा पूजनावेळी मंदीर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच गेल्या 30 वर्षापासून बार्शीहून पायी चालत आलेल्या श्री स्वामी समर्थ दिंडीच्या मुक्कामावेळी स्वरध्यास गायन विद्यालयाच्या सानिका कुलकर्णी, रसिका कुलकर्णी, अक्षय भडंगे यांचा स्वामींच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंदीराच्यावतीने पायी अक्कलकोटला जाणार्या पालखीतील सर्व भक्तांचा सत्कार पदाधिकार्यांच्यावतीने करण्यात आला.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी बहुजन रयत परिषदेच्या कोमल ढोबळे यांच्या हस्ते स्वामींची महाआरती करून अन्नदान करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदीर विविध फुलांनी सजविण्यात आलेले होते. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदीर समितीचे संस्थापक गोरखनाथ डोंगरे, अध्यक्ष प्रमोद डोंगरे, जगदीश नायर, संतोष शिंदे, मंगल भोसले, सरला डोंगरे, निमिषा वाघमोडे, कविता गुलमिरे, आशा घायाळ, सुशीला गवळी, गौरी डंके, अनिल सोमवंशी, रुपेश शिंदे, समृध्द डोंगरे, राजू ढोबळे, विकास गुलमिरे, कृष्णा घाडगे, ऋतुराज भोसले, जय सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.