सोलापूर : सोलापूर शहरातील मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजवर ज्यांनी आपल्या खुल्या प्लॉटचे, तसेच घर जागांचे टॅक्स भरले नाहीत, त्यांच्यावर टॅक्स बिलावर महापालिका प्रति महा दोन टक्के दंड, नोटीस फी आणि वॉरंट फी लावते. आता महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे जे मिळकत दार 2023 -24 अखेरपर्यंत पाठीमागील थकबाकी सह संपूर्ण मिळकत कर एक रकमी बनतील अशा मिळकतदारांना त्यांच्या बिलावर लावण्यात आलेली नोटीस फी ,वॉरंट फी आणि दंड शंभर टक्के माफ केला आहे .याबाबत आजच महापालिकेने जाहीर प्रसिद्धीकरण केले आहे जाहीर केले आहे.
मोठ्या थकबाकीदारांना याचा मोठा फायदा होणार असून बिलामध्ये जवळपास 50%च सूट मिळणार आहे त्यामुळे तुमच्या मिळकत कराची रक्कम 28 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान भरून या अभय योजनेचा फायदा घेऊ शकता. ही योजना महापालिकेची थकबाकी वसूल करण्यासाठी चांगली आहे मात्र जे मिळकतदार नियमितपणे पाच टक्के सूट घेऊन टॅक्स प्रामाणिकपणे भरतात त्यांच्यावर मात्र अन्यायकारक आहे. कारण वारंवार अशा अभय योजनेसारख्या योजना जाहीर झाल्यामुळे थकबाकी ठेवण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आता या अभय योजनेतून किती कोटी टॅक्स वसूल होईल याकडे लक्ष लागले आहे