आमदार सुभाष देशमुखांचा उपक्रम, अधिकारी, मान्यवरांची उपस्थिती
सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मान्यवर मंडळी, अधिकारी, भाजप पक्षाचे पदाधिकारी अशा एकूण चार हजार जणांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.
होटगी रोड येथील आमदार देशमुख यांच्या निवासस्थानासमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यंदाचे हे २० वे वर्ष आहे. दिवाळी फराळाच्यानिमित्ताने मतदारसंघातील नामवंत व्यक्तींसह प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे.
यावेळी नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, आयुक्त शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र प्राधिकरण धीरज साळे, ‘सकाळ’चे निवासी संपादक अभय दिवाणजी, एस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजकुमार पाटील, माजी नगरसेवक, लोकमंगल बँकेचे संचालक, शहर व ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी, मतदार संघातील नागरिक, शासकीय विभागातील अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.