येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी केला. देशभरातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. पीएम किसान सन्मान निधी, शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन मानली जाते. पीएन किसान लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण द्वारे आर्थिक सहाय्य देते.
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा करते. केंद्र सरकारने 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी केला होता. आज चार महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरावा हफ्ता जमा झाला आहे.