सोलापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गावांमध्ये परिवर्तन झाले. सर्वांचे लक्ष लागलेल्या कासेगाव, उळे आणि वळसंग ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षानंतर परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले.
उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, दक्षिणचे तहसीलदार जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण तहसील कार्यालय मध्ये सकाळी आठ वाजता यांना ग्रामपंचायत साठी सुरुवात झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या कासेगाव आणि वळसंग या दोन ग्रामपंचायत साठी शेवटी मतमोजणी झाली.
कासेगाव मध्ये माजी सरपंच दिवंगत नेते श्रीकांत वाडकर यांचे चिरंजीव यशपाल वाडकर एक हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शंकर वाडकर यांचा पराभव केला त्यापैकी नऊ जागा जिंकण्यात श्री शंभू महादेव परिवर्तन पॅनलला यश आले.
उळे ग्रामपंचायत मध्ये यावेळी सत्तांतर झाले. मनोज गुंड या युवकाच्या नेतृत्वाखाली सर्व जागा जिंकून एक हाती सत्ता मिळाली आहे. या ठिकाणी अंबिका कोळी या सरपंच पदावर विजयी झाल्या. औज ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत कविता भारत रुपनवरे या एक मताने विजयी झाल्या आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतचे सरपंच पुढील प्रमाणे
- उळे – अंबिका दशरथ कोळी (नामाप्र) – 1412 मते
- कासेगाव – यशपाल श्रीकांत वाडकर (सर्वसाधारण) – 1908 मते
- दोड्डी – महेश व्यंकटराव पाटील (नामाप्र) 970 मते
- गावडेवाडी – संगीता कैलास पांढरे (सर्वसाधारण) 378 मते
- कुसूर खानापूर – लक्ष्मी मनोहर नरोटे (नामाप्र) 921 मते
- औज – कविता भारत रुपनवरे (सर्वसाधारण) 562 मते
- शिरवळ – गौडणवरु शरणाप्पा लक्ष्मण (नामाप्र) 868 मते
- उळेवाडी -अक्षय गौतम गायकवाड (अनुसूचित जाती) 992 मते
- वळसंग – अंटद जगदीश दयानंद (सर्वसाधारण) 2270 मते,