सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे .गेल्या सात वर्षापासून सोलापूर शहरातील रखडलेल्या बाह्यवळण 54 मीटर रस्त्यावरील रेल्वे भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सात नोव्हेंबर रोजी रेल्वे कडून मेगाब्लॉक घेऊन या ठिकाणी तयार केलेले सिमेंटचे चौकोनी स्ट्रक्चर भुयारात ढकलले जाणार आहेत. गेल्या सात वर्षापासून हे काम रखडले होते यासाठी सोलापूर महापालिकेने 18 कोटी रुपये रेल्वे कडे भरले आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंती नगर कडे जो रस्ता जातो त्याला 54 मीटर रस्ता म्हटले जाते प्रत्यक्षात तो 21 मीटर एवढाच रुंदीचा आहे. महापालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन नुसार हा रस्ता 54 मीटर रुंदीचा दाखवण्यात आला आहे. मात्र महापालिकेच्या नगर अभियंता तसेच नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे या 54 मीटर रस्त्यावरच अनेकांनी बांधकामे केली आहेत त्यामुळे प्रत्यक्ष पुन्हा एकदा नव्याने 54 मीटरच्या हद्दी खुणा कायम करणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंती नगर पुढे रेल्वे क्रॉसिंग करून हा मंगळवेढा रोड क्रॉसिंग करणार आहे. पुढे सलगर वस्ती मार्गे हा रस्ता सैफुल कडे निघणार आहे यासाठी आजवर सुमारे 20 ते 25 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या रस्त्याच्या सुरुवातीलाच म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिथून हा रस्ता सुरू होतो तिथंच मूळ मिळकतदारांचा प्रश्न महापालिकेने सोडविला नाही त्यामुळे हा 54 मीटर पूर्ण क्षमतेने रस्ता विकसित करणे आणि यावरून वाहतूक सुरू करणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे मात्र हा रस्ता शहराच्या दळणवळणासाठी महिलाचा दगड ठरेल यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे