सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, नागेश करजगी ऑर्किड स्कूल व क्विक हिल फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे २०० व विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या रॅलीचे उद्दघाटन नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे चेअरमन डॉ. कुमार करजगी व संगणकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. रॅलीचा मार्ग ऑर्किड स्कूल – सुपर मार्केट – उमा नगरी असा होता. शेवटी शाळेजवळ रॅलीचे विसर्जन झाले. रॅलीच्या सुरुवातीला सर्वांनी सुरक्षिततेची शपथ घेतली.
सध्याच्या ऑनलाईन युगात होणारे सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, सोशल मीडियावर काम करत असताना घ्यावयाची काळजी, मोबाइलवर अँप इन्स्टॉल करताना कोणते सेटिंग करावे अश्या विविध विषयावर रॅलीद्वारे माहिती देऊन समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रॅलीचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार व कुलसचिव योगिनी घारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य रुपाली हजारे, क्विक हिल फॉउंडेशनचे अजय शिर्के, सुगंधा दानी व गायत्री पवार यांनी सहकार्य केले. नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुम्पी, सचिव वर्षा विभुते, व सौ. अन्नपूर्णा अनगोन्डा आदी रॅलीमध्ये सामील झाले होते.
संकुलातील डॉ. आर. एस. मेंते, डॉ. ए. आर. शिंदे, डॉ. जे. डी. माशाळे, डॉ. एस. डी. राऊत, श्री. सी. जी. गार्डी, श्री. ज्ञानेश्वर निंबाळकर, संदीप पोटे, विद्यार्थी स्वयंसेवक व नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रॅलीच्या उद्दघाटन प्रसंगी प्रियांका चव्हाण हिने सूत्रसंचालन केले. रॅलीचा समारोप चरिता जवळकोटी हिच्या आभार प्रदर्शनाने झाला.